भाईंदर मधील १७ पहलवानांची निवड मुंबई विभागस्तरिय शालेय कुस्ती स्पर्धे करिता ..

मीरा भाईंदर दि २०: मीरा भाईंदर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा श्री गणेश आखाडा भाईंदर येथे शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी पार पडली. यात विविध गटांतील १७ पहिलवान मुंबई येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील शालेय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
मीरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांच्या शुभ हस्ते आखाड्या चे पूजन करून कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली .
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
🔺 १४ वर्षा खालील मुले 🔺
१. पै.स्वराज नितीन खाडे ३५ किलो🥇 प्रथम क्रमांक
२. पै.मयूर अनिल शेडगे ३८ किलो 🥇प्रथम क्रमांक
३. पै.प्रतीक रामचंद्र बोबडे ४१ किलो🥇 प्रथम क्रमांक
४. पै.दक्ष लखाराम चौधरी ४४ किलो🥇 प्रथम क्रमांक
५. पै.युवराज वेनीलाल माली ५७ किलो🥇 प्रथम क्रमांक
६. पै.स्पंदन किशोर पाटील ६८ किलो🥇 प्रथम क्रमांक
🔺 १४ वर्षा खालील मुली 🔺
१. कु.प्रिय ब्रिजेश गुप्ता ३३ किलो🥇 प्रथम क्रमांक
२. कु.अर्पिता चव्हण ३९ किलो🥇 प्रथम क्रमांक
३. कु.तनुजा विनोद मांढरे ४२ किलो🥇 प्रथम क्रमांक
🔺 १७ वर्षा आतील मुले 🔺
१. पै.हरेकृष्ण मनोज तिखन ४५ किलो🥇 प्रथम क्रमांक
२. पै.साईनाथ गायकवाड ४५ किलो🥈 द्वितीय क्रमांक
३. महावीर रामधनी गुप्ता ४५ किलो🥉 तृतीय क्रमांक
४. महेश उमाकांत ढगे ६५ किलो🥇 प्रथम क्रमांक
🔺 १७ वर्षा आतील मुली 🔺
१. कु.कविता विनोद राजभर ४६ किलो🥇 प्रथम क्रमांक
२. कु.स्नेहा कन्हैया गुप्ता ५३ किलो🥇 प्रथम क्रमांक
३. कु.सुप्रिया ब्रिजेश गुप्ता ५७ किलो🥇 प्रथम क्रमांक
४. कु.मनस्वी दिलीप राऊत ६१ किलो🥇 प्रथम क्रमांक
🔺 १९ वर्षा आतील मुले 🔺
१. पै.लकी अडबल्ले ६५ किलो🥇 प्रथम क्रमांक
२. पै.साजिद शेख ७० किलो🥇 प्रथम क्रमांक
प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व पहलवानांच्या मुंबई विभागस्तरीय स्पर्धा कळंबोली पोलिस हेडकॉटर या ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.