दंगल घडविण्यासाठी फेसबुकचा वापर
मुंबई दि. २० (प्रतिनिधी) – फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण करणा-या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी सायबर क्राईम तसेच परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
सोशल मिडीयाच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवरील “भाजपा येणार मुंबई घडवणार” या अकांऊंटवरुन दोन समाजा मध्ये वाद निर्माण होईल असे लिखाण करण्यात आले होते. शिवाय या पोष्ट मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांचे फोटो वापरण्यात आले होते. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ब्रेक्रींग न्यूज असे शिर्षक देऊन ते प्रसारीत करण्यात आले होते. त्यामुळे खासदार संजय दिना पाटील यांची बदनामी करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन जातीय दंगल घडविण्याचा हा कट होता. असा आरोप खासदार संजय दिना पाटील यांनी केला असून अशा समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी वांद्रे येथील सायबर क्राईम तसेच परिमंडळ सहाच्या उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

लोकसभेत झालेला पराभव त्यांना सहन झालेला नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून ते अशा भूलथापांनी वाहून जाणार नाही. समाजात गैर प्रकार होऊ नये म्हणुन आम्ही आणि पोलीस प्रशासन काळजी घेत असल्याची माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी दिली.ML/ML/MS