भायखळा येथील ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन जल्लोषात

मुंबई, दि १६
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भायखळा विभागाचे आमदार मनोज जामसुतकर आणि माजी नगरसेविका सोनम जामसुतकर तसेच विधानसभा सहसंघटक सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक परिवार संघ माझगाव ताडवाडी परिसर येथे “ज्येष्ठांचे स्नेह सम्मेलन” कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या प्रसंगी जेष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आमदार मनोज जामसुतकर आणि सोनम जामसुतकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. सदर कार्यक्रमाला महिला शाखा संघटिका सौ संध्या तळेकर, महिला शाखा समन्वयक सौ विद्या राबडिया त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.KK/ML/MS