नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार

मुंबई, दि १६: नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडको मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले.
मंत्रालय मध्ये अटलसेतु जवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत आयोजित बैठकीत. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सिडको आणि एमएमआरडी अचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री अॅड आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला समृध्द ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे.या सांस्कृतिक वारश्याची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील, त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कृती माहिती होण्यासाठी अटल सेतू जवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत निधी मागण्याचा प्रस्ताव तयार करा. सिडकोने निधीमागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून मान्यता घेवून या कामाला गती द्यावी.सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध परवानग्या विभागाने घेण्यात याव्यात असेही ते म्हणाले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *