डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना प्रोत्साहान दिले – शरद पवार

मुंबई, नाशिक, दि, १५- हैद्राबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयानंतर राज्यात मराठा – ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे. राज्यातील सामाजिक घडी विस्कटली जात आहे. अशा वेळी वाट्टेल ती किंमत द्यावी लागली तरी सामाजिक ऐक्य जपायला असे प्रतिपादन करताना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात आले. अशी माहिती राष्टवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांनी दिली.
नाशिक येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगाी ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, या कार्यक्रमा विषयी बोलताना पवार म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दादासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि त्यानंतर राजकारणात आले, बाबासाहेबांनी पक्ष काढला होता, दादासाहेब गायकवाड यांना त्या पक्षातून उमेदवारी मिळाली होती, आणि ते निवडून देखील आले. तेव्हाचा काळ वेगळा होता, तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. त्या चळवळीमध्ये नाशिकचा वाटा मोठा आहे. नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण करत होते. तेव्हाच देशावर मोठं संकट आलं, चीनने भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी अस्वस्थता निर्माण झाली. चीनचे आक्रमण झाले तेव्हा संरक्षण खात्याची जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही, म्हणून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
तेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री होते, त्यांना नेहरूंनी बोलावून घेतले. चीनच्या आक्रमणानंतर सैन्यदलाचं मनोबल खचलं होतं, तेव्हा चव्हाण साहेबांनी जबाबदारी घेतली होती. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. १९५७ ला संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर १९६२ ला यशवंतरव चव्हाण हे लोकसभेचे सदस्य झाले. नाशिकने चव्हाण साहेबांना बिनविरोध निवडून दिले हा इतिहास आहे. दादासाहेब यांच्या निमित्ताने काँग्रेस सोबत आरपीआयची पहिल्यांदा युती झाली. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांना दिले पाहिजे, असं यावेळी शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.KK/ML/MS
—००—