सय्यद जिशान अहमद यांची काँग्रेस खारघर निरीक्षकपदी निवड

मुंबई, दि १५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सय्यद जिशान अहमद यांची पनवेल खारघर निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. खारघर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक रंजनपाड़ा येथील कार्यालयात संपन्न झाली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातर्फे प्रत्येक ब्लॉक निहाय नवीन निरीक्षकांची नियुक्ती करून संघटन वाढ त्याच्या समवेत खारघर मधील सर्व पदाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक घेवून चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, विश्वनाथ चौधरी शहराध्यक्ष खारघर ब्लॉक, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, माजी उपाध्यक्ष प्रदेश कॅप्टन कलावत,अरविंद सोनटक्के, नौफिल सय्याद जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग, हेमराज म्हात्रे युवक जिल्हाध्यक्ष, शैलेश पाटणे जिल्हाध्यक्ष सेवादल, शिल्पा पाठक जिल्हा उपाध्यक्ष, मनोज बिरादार जिल्हा सरचिटणीस, भारती जळगावकर प्रदेश महिला, लतीफ नळकांडे, ताहिर खामकर, मुजावर हासन, ललिता सोनवणे, रूपेश घरत, सोनिया सहोता, ईशिका सुधीजा, शबाना राजापकर, जोस जेम्स, आर.यू. सिंग, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS