भाजपा विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांचा गडचिरोली दौरा – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते

गडचिरोली, दि १५
गडचिरोली येथे आयोजित भाजपा कार्यकारिणी विस्तारित बैठक व सेवा पंधरवडा या निमित्ताने विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर हे गडचिरोलीत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी नागपूरचे माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांचेही उपस्थितीत आगमन झाले. यावेळी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी डॉ. उपेंद्रजी कोठेकर व सुधाकरजी कोहळे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.
भेटीच्या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व मान्यवरांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे हास्य खुलले होते. सौहार्द, आत्मीयता व आपुलकीने भरलेले हे वातावरण एकप्रकारे आनंदोत्सवाचे स्वरूप घेऊन गेले. ही सदिच्छा भेट हसत खेळत, आनंदाने व मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली.
या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धनजी चव्हाण यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS