अधिकारांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या थोर नेत्याला वाहिलेली ही मानवंदना.. प्रेरणादायी.

नवी मुंबई, दि १४
स्व. लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मानवंदना कार रॅलीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे सहभागी झाले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांशी संवाद साधून दि. बा. पाटील साहेबांच्या कार्याचा व त्यांच्या अपूर्व योगदानाचा गौरव केला.

यावेळली माध्यमाशी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले…आपल्या अधिकारांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या थोर नेत्याला वाहिलेली ही मानवंदना खरोखर प्रेरणादायी ठरली आणि मला या रॅली मध्ये भाग घेता आला हा मीं माझा सन्मान समजतो.ML/ML/MS