मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी व्यापक मदत मोहीम

 मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी व्यापक मदत मोहीम

मुंबई, दि १४
पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे लाखो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या पुरामुळे राज्यातील सुमारे १५ लाख लोक बाधित झाले असून, यात सुमारे ३००० गावे आणि ५ लाख एकरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे.

या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन चे डॉ फरहा अन्वर हुसेन शेख आणि अन्वर शेख ने एक मोठ्या प्रमाणावर मदत अभियान सुरू केले आहे. गेल्या एक आठवड्यापासून हे फाऊंडेशन सोशल मीडिया, ईमेल आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून मदत गोळा करत आहे. या अभियानाला पुणे शहेरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या मदत मोहिमेचा भाग म्हणून, देशातील अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांनी जीवनावश्यक औषधे, अँटिबायोटिक्स आणि वैद्यकीय उपकरणे पुरवली आहेत. त्याचप्रमाणे, अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी सुमारे १००० कुटुंबांसाठी कपडे, अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. वैयक्तिक दात्यांनी दिलेल्या थेट आर्थिक मदतीने हे अभियान अधिक प्रभावी ठरले आहे. फाऊंडेशनने गोळा केलेली ही सर्व मदत पंजाबच्या मुख्यमंत्री राहत निधीला सुपूर्द केली जाणार आहे, जेणेकरून पीडितांना थेट आर्थिक सहाय्य मिळू शकेल.

या व्यतिरिक्त, मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांचे सुमारे १० स्वयंसेवक पंजाबमधील पूरग्रस्त भागांमध्ये तात्पुरते उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांमध्ये (रिलीफ कॅम्प) जाणार आहेत.

हे स्वयंसेवक तिथे एक विशेष ‘रिलीफ कॅम्प’ उभारणार आहेत, जिथे डॉक्टरांच्या टीममार्फत वैद्यकीय सेवा आणि औषधे पुरवली जातील.

पूरग्रस्त भागात साथीच्या रोगांचा धोका वाढल्यामुळे ही वैद्यकीय मदत अत्यंत आवश्यक आह

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन नेहमीच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्यात आघाडीवर राहिले आहे.

पंजाबमधील या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

या कठीण काळात फाऊंडेशन सर्वांना आवाहन करत आहे की त्यांनी पुढे येऊन या मदतकार्यात सहभागी व्हावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना मदत पोहोचवता येईल.

अधिक माहितीसाठी:
डॉ फरहा अन्वर हुसेन शेख
अन्वर हुसेन शेख
मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन
ईमेल:missfarhafoundation@ जीमेल.कॉम
फोन: 8459867838 / 9511696198
KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *