लोणार सरोवर परिसरात नाचणारे मोर पर्यटकांना करत आहेत आकर्षित…

बुलडाणा दि १४ : – बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि अभयारण्य परिसरामध्ये विविध जाती प्रजातीचे पक्षी, प्राणी वास्तव्यास आहेत.. त्यामध्ये मोरांची संख्या अधिक आहे.. सरोवर परिसरात असलेली मंदिरे आणि सरोवराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेटी देत असतात, याच परिसरात मनमुराद पणे नाचतानाचे मोराचे मनमोहक दृश्य पर्यटकांना पाहता आले.. डोणगाव येथील रुषांक चव्हाण या पर्यटकाने नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे.. नागरिकांनाही या नाचणाऱ्या मोराचे मोठे आकर्षण असल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.ML/ML/MS