केंद्र सरकारकडून राज्यांना आरोग्यविषयक Alert जारी

नवी दिल्ली, दि. १२ : देशभरात मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात पुढील काही महिन्यांत सतर्क राहण्याचे आणि डेंगू-मलेरियासारख्या आजारांविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय तत्काळ राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा आरोग्यसंकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी 11 सप्टेंबर रोजी देशातील डेंगू-मलेरियाच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेतला होता. त्यानंतर मंत्रालयाने ही अॅडव्हायजरी जारी केली. सर्व मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचे वैयक्तिक निरीक्षण करण्यास सांगितले असून 20 दिवसांच्या आत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
-स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांना नागरिकांमध्ये डेंगू-मलेरियाविषयी जागरुकता वाढवण्याचे आदेश.
-सर्व सरकारी रुग्णालयांत पुरेशा औषधांचा साठा ठेवणे, तपासणी सुविधा उपलब्ध करणे, रुग्णांसाठी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करणे आणि मच्छरविरहित वातावरण तयार करण्याचे आदेश.
-विशेषतः दिल्ली-एनसीआर प्रदेशातील स्थिती गंभीर असल्याने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.