भाईंदर येथे गायन आणि वाद्य जुगलबंदी

ठाणे दि ११– स.न.वि.वि. नाट्यशाला आणि
राम सेवा मंडळ भाईंदर आयोजित ” खास प्रशिक्षित आणि हौशी संगीत कलाकार वादक गायकांसाठी…”
नांदी गायन , नाट्य संगीत गायन आणि वाद्य जुगलबंदी
( तबला, व्हायोलिन, पखवाज ) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
एका टीम मध्ये किमान दोन वादक असण्याची अट घालण्यात आली आहे.याशिवाय हिंदी, उर्दू साहीत्यप्रेमींसाठी आणि शालेय शिक्षकांसाठी
मुन्शी प्रेमचंद की कहांनिया कथावाचन, कथाकथन,
वपु कथावाचन , शंन्ना नवरे, जयवंत दळवी( यंदा जन्मशताब्दी), जी ए कुलकर्णी ह्यांच्या कथावाचन, नारायण सुर्वे कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर ह्यांच्या पद्य कविता वाचन, आचार्य अत्रे ह्यांच्या अग्रलेख आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भाषणांचे अभिवाचन
” लोकमान्य ” केसरी मराठा अग्रलेख अभिवाचन, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
वि.स.खांडेकर ह्यांच्या ” ययाती” कादंबरील व्यक्तिमत्व वाचन, रामधारीसिंह ” दिनकर” ह्यांच्या ” रश्मीरथी” ह्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाकाव्याचे अभिवाचन देखील आयोजित करण्यात आले आहे.
ही रंगसाहीत्ययात्रा खास साहित्य रसिक शिक्षण ललीत कलाकार ह्यांसाठी असून सादरीकरण आणि इतर माहीतीसाठी संपर्क करा.
नारायण गोखले
अध्यक्ष, सनविवि
सिराज शेख
उपाध्यक्ष, सनविवि
डाॅ शिरीष गोपीनाथ ठाकूर 9029884055
संयोजक
ML/ML/MS