शिवसेनेने दिल्या महिलाना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन आणि घरघंटी
मुंबई, दि १०
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या पाठपुराव्यानुसार माजी आमदार यामिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गरजू व स्वावलंबी महिलांना स्वयंरोजगारांसाठी घरघंटी तसेच शिलाई मशीनचे वाटप भायखळा येथील महापालिका ई कार्यालयात करण्यात आले. मुंबई महापालिकेकडून ८४४ लाभार्थ्यांसाठी शिलाई मशीनची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु आम्ही केलेल्या विशेष प्रयत्नांनी आणि अथक पाठपुराव्यामुळे पालिका प्रशासनाने तब्बल १३१० शिलाई मशीन लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या हा उपक्रम लाभार्थी महिलांसाठी स्वयंरोजगाराचे माध्यम ठरेल, असा विश्वास वाटतो. अशी माहिती माजी आमदार यामिनी जाधव यांनी दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त ई विभाग श्री. रोहित कुमार त्रिवेदी साहेब, समाज विकास अधिकारी श्री. मनोज कुमार शितूत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी शिवसेनेचे भायखळा विधानसभा प्रभारी विभागप्रमुख विजय लिपारे (दाऊ) , युवासेना दक्षिण मुंबई लोकसभा अध्यक्षनिखिल जाधव , सर्व महिला पदाधिकारी संघटनेतील माझे अन्य सहकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS