नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

 नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई, दि. १०:- नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये व स्थानिक प्रशासनाच्या तसेच भारताच्या दूतावासाच्या सूचनांचे पालन करावे.

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः
+977-980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
+977-981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. कृपया अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती प्राप्त करावी व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र (91- 9321587143 व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध 91- 8657112333 व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध )ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *