ईद ए मिलाददून नबी उत्साहात साजरी
मुंबई, दि. ९ – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साज-या होणा-या ईद-ए-मिलाद मिरवणुक गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी आदी भागात काढण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.

प्रेषित मोहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त गोवंडी, शिवाजी नगर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक दिसून आले. मिरवणुकी वेळी पाणी, सरबत, खजूर, चॉकलेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमांच्या दरम्यान कडेकोट पोलीस बन्दोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते.
घाटकोपर, विक्रोळी, पार्कसाईट या ठिकाणी ही ईद ए मिलाददून नबी उत्साहात साजरी करण्यात आली. या भागात मिरवणुक काढण्यात आली. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.ML/ML/MS