६५ अनधिकृत इमारतींवरील कारवाई जनक्षोभामुळे स्थगित
ठाणे दि ९ :- “डोंबिवली रेरा घोटाळ्यातील ६५ अनधिकृत इमारतींवर कारवाईचा उगारलेला बडगा आज मोठ्या जनक्षोभामुळे स्थगित करण्यात आला. समर्थ कॉम्प्लेक्सवर आजच पालिकेचा हातोडा पडणार असल्याने नागरिक संतप्त झाले होते. हातात पेट्रोलच्या बाटल्या, निषेधाचे पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने इमारतीखालीच आंदोलन सकाळी सुरू झाले.

‘आम्हाला न्याय द्या, भीक नको… आश्वासन दिलं मग कारवाई का?’ असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत होते. पूर्ण रात्र रहिवाशांची बैठक झाली, त्यानंतर एकूण स्थिती पाहून प्रशासनाने आज काहीच कारवाई केली नाही तरी कारवाईचे ढग कायम आहेत. तर कारवाईसाठी आलात तर आम्ही हलणार नाही, आमचा जीव गेला तरी चालेल अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.
“डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्ससह ६५ अनधिकृत इमारतींवर पालिकेची कारवाई सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त रहिवासी इमारतीखाली उतरले होते. सकाळपासूनच शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले , “न्याय द्या, अन्यथा आत्महत्याशिवाय पर्याय नाही” असा इशारा रहिवाशांनी प्रशासनाला दिला आहे.ML/ML/MS