६५०० कोटीतून उभं राहतंय अत्याधुनिक ‘नवीन नागपूर’ शहर

 ६५०० कोटीतून उभं राहतंय अत्याधुनिक ‘नवीन नागपूर’ शहर

नागपूर, दि. ८ — महाराष्ट्र सरकारने नागपूरच्या दक्षिण भागात एक अत्याधुनिक, जागतिक दर्जाचं शहर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ‘नवीन नागपूर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. आज नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको, NBCC यांच्यात करार करण्यात आला आहे. नवीन नागपूरसाठी NBCCप्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहेत. तर 1710 एकरमध्ये नवीन नागपूर विकसित होणार आहे. 148 किमीचा नागपूर आऊटर रिंगरोड उभारला जाणार आहे. तर हुडको 11,300 कोटी रुपये देणार असून यातील 6500 कोटी नवीन नागपूरसाठी, तर 4800 कोटी आऊटर रिंगरोडसाठी देणार आहेत. तर एनबीसीसी विकास करणार आहेत. a

काय आहे ‘नवीन नागपूर’?
१,७८० एकर जागेवर हे शहर उभारण्यात येणार आहे.

मुंबईतील बीकेसी (BKC) च्या धर्तीवर हे आंतरराष्ट्रीय व्यवसाय व वित्तीय केंद्र (IBFC) असेल.

मिहान, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र, आणि समृद्धी महामार्ग याच्या जवळ हे शहर वसवले जाणार आहे.

स्टार्टअप्स, MSMEs, IT कंपन्या, आणि आंतरराष्ट्रीय सेवा प्रदाते यांना आकर्षित करण्यासाठी विशेष पायाभूत सुविधा तयार केल्या जातील.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
प्लग-अँड-प्ले मॉडेल: म्हणजेच तयार पायाभूत सुविधा, जिथे कंपन्या थेट कार्य सुरू करू शकतील.

भूमिगत युटिलिटी टनेल्स, डिस्ट्रिक्ट कूलिंग सिस्टम, आणि स्वयंचलित कचरा व्यवस्थापन यांसारख्या स्मार्ट सुविधा.

व्यावसायिक, निवासी आणि मिश्र वापर प्रकल्प यांचा समावेश.

९ तालुक्यांतील ९९ गावांमधून जाणारा तिसरा रिंगरोड, जो शहरातील वाहतूक कोंडी कमी करेल.

सामंजस्य करार आणि निधी
NMRDA आणि NBCC (India) Ltd. यांच्यात १,००० एकर विकासासाठी करार.

HUDCO कडून ₹११,३०० कोटींचा वित्तपुरवठा मंजूर.

पहिल्या टप्प्यासाठी ३५०० कोटी, तर भूसंपादनासाठी ३००० कोटी खर्च अपेक्षित.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृष्टिकोन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाला गती मिळाली असून, त्यांनी याला विदर्भाचा गेम चेंजर प्रकल्प म्हटलं आहे. नागपूरच्या आर्थिक नकाशावर हे शहर एक नवीन ओळख निर्माण करणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *