बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी
सर्व पक्ष संघटनांची मुंबईत एकत्रित बैठक*

 बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठीसर्व पक्ष संघटनांची मुंबईत एकत्रित बैठक*

मुंबई, दि ८~ बुद्धाया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे जागतिक सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.तरीही हे श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात नाही हा मोठा अन्याय आहे.त्याविरुद्ध देशात आंदोलन केले जात आहे.बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला महाराष्ट्रातून ताकद देण्याची गरज आहे.मुंबईत आणि महाराष्ट्रात सर्व बौद्ध समाजाच्या एकजुटीतून. महाबोधी महाविहार मुक्तीचे मुंबईत विराट आंदोलन उभारण्याची गरज आहे.त्यासाठी सर्व बौद्ध समाजाच्या विविध राजकीय पक्ष गट आणि धार्मिक संघटनांची एकजूट उभारणे गरजेचे आहे.त्यासाठी येत्या 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत सांताक्रुझ पूर्व कालिना विद्यापीठ कॅम्पस समोर भीम छाया सांस्कृतिक केंद्र येथे सर्व बौद्ध समाजाच्या राजकीय नेत्यांची धार्मिक संघटनांची एकत्रित महत्वपूर्ण बैठक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीचे निमंत्रण केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सर्व रिपब्लिकन गटांच्या नेत्यांना संघटनांना आणि धार्मिक संघटनांना पाठवले आहे..अशी माहिती आज पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि रिपाइं चे सचिव सुरेश बार्शिंग यानी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली.

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती साठी मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात सकल बौद्धांच्या एकजुटीचे आंदोलन उभारणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून निष्पक्षपणे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन उभारले पाहिजे.या एकजुटीच्या आंदोलनाच्या बैठकीचे निमंत्रण
वरिष्ठ नेते ॲड.प्रकाश आंबेडकर ; प्रा.जोगेंद्र कवाडे;भीमराव आंबेडकर आनंदराज आंबेडकर; डॉ राजेंद्र गवई; नाना इंदिसे; अर्जुन डांगळे ; जयदेव गायकवाड ;दिलीप जगताप; राजरत्न आंबेडकर; खा.चंद्रकांत हंडोरे; चंद्रबोधी पाटील; गगन मलिक; ज वी पवार; कुणाल बबन कांबळे; विलास गजघाटे ; कनिष्क कांबळे; अनिकेत संसारे; व्ही एस मोकळे; सुनील उर्फ भाऊ निर्भावने; सागर संसारे;; तानसेन ननावरे ;भाई गिरकर; सुरेश माने; खा. वर्षाताई गायकवाड; संजय बनसोडे; राम पंडागळे; नितीन मोरे;
सुरेश केदारे; रवी गरुड; नागसेन कांबळे तसेच बौद्ध धर्मगुरू भदंत सुरई सुसाई; भदंत राहुल बोधी महाथेरो ; भदंत विरत्न तसेच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे आकाश लामा; भदंत विनाचार्य
आदींना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.

महाबोधी महाविहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान आहे त्यावर पूर्णपणे बौद्धांचाच अधिकार आहे.हिंदू मंदिरांवर हिंदूंची ट्रस्ट ; मुस्लिम मशिदीवर मुस्लिमांची ट्रस्ट ख्रिस्ती धर्माच्या चर्चवर ख्रिस्ती धर्मियांची ट्रस्ट असते तसेच महाबोधी महाविहार हे बौद्धांचे असून त्यावर बौद्धांची ट्रस्ट विश्वस्त संस्था असली पाहिजे. महाबोधी महाविहार च्या ट्रस्ट बाबत झालेला कायदा भारतीय संविधान लागू होण्याच्या आधीचा कायदा आहे.1949 चा बी टी ऍक्ट रद्द झाला पाहिजे.त्या कायद्यात दुरुस्ती करून महाबोधी महाविहार च्या ट्रस्ट मध्ये सर्व सदस्य बौद्ध असले पाहिजेत; सर्व ट्रस्टी बौद्ध असावेत आणि चेअरमन सुद्धा बौद्ध असला पाहिजे.
या ट्रस्ट मध्ये काही ट्रस्टी हिंदू आल्यामुळे बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार परिसरात कर्मकांड पिंडदान केले जाते ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात करू नयेत. महाकारुणी भगवान बुद्धांच्या विचाराविरुद्ध कर्मकांडाचे पिंडदानाचे प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होता कामा नये आदी मागण्यांसाठी संपूर्ण बौद्ध समाजाचे मुंबईत विराट आंदोलन उभारण्यासाठी सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना राजकीय पक्ष रिपब्लिकन चे सर्व गट सर्व बौद्ध धम्मीय संस्था संघटनांची सर्वसमावेशक बैठक येत्या 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत भीमछाया सांस्कृतिक केंद्र कालिना संताक्रुझ पूर्व येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *