‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. ५ : ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला हो.ता आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता आता प्रचंड शिगेला पोहोचली आहे.
नुकत्याच झळकलेल्या नवीन पोस्टरमध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स त्यांच्या नेहमीच्या धम्माल अंदाजात दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धार्थ जाधवही आहे. या धमाल चौकडीत आता रिंकू राजगुरूचाही समावेश आहे.
दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाला की, “या वेळची जबाबदारी जास्त मोठी होती. पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र कलाकार, निर्माते, पटकथा आणि संवाद लेखक संदीप दंडवते आणि तंत्रज्ञ यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट एक कौटुंबिक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे.”
अंकुश चौधरी यांची कथा आणि दिर्दर्शन, संदीप दंडवते यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची निर्माती अमेय खोपकर यांनी केली आहे.