त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समिती सदस्यांची नियुक्ती

 त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई, दि. ५ — राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या समितीमध्ये डॉ. सदानंद मोरे, (माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती), डॉ. वामन केंद्रे, (संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)), डॉ. अपर्णा मॉरिस, (शिक्षणतज्ज्ञ, पुणे), सोनाली कुलकर्णी जोशी, (भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे), डॉ. मधुश्री सावजी, (शिक्षणतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. भूषण शुक्ल, (बालमानसतज्ज्ञ, पुणे) हे सदस्य तर, संजय यादव, (राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई) हे सदस्य सचिव असतील.
उपरोक्त समिती दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यकक्षेप्रमाणे कामकाज करेल तसेच त्रिभाषा धोरणासंदर्भातील अहवाल तीन महिन्यांच्या मुदतीत शासनास सादर करेल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *