मनसेकडून मराठा आंदोलकांना पुरणपोळ्यांचे वाटप
मुंबई : मनसे नेते सन्माननीय अमित ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवार मलबार हिल विधानसभे तर्फे विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्र्वर पुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभाग क्रमांक २१८ च्या महिला शाखाध्यक्षा व कनिष्का बचत गटाच्या अध्यक्षा सौ. वंदना रोकडे यांच्या वतीने मराठा आंदोलकांना पुरणपोळी वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
या प्रसंगी शाखाध्यक्ष रवींद्र शिंदे, अर्जुन जाधव, मिथुन रोकडे, महाराष्ट्र सैनिक व बचत गटाच्या महिला उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्याचे जाहीर होताच मंगळवारी आझाद मैदान सह उपस्थित सर्व ठिकाणी गुलाला उधळून मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला होता. सदर बातमी कळताच मलबारहिल मधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दोन हजार पुरण पोळ्या घेऊन आझाद मैदानात रवाना झाले होते. ह्यावेळी मराठा बांधव आझाद मैदानातून बाहेर पडू लागले होते.त्याची क्षणी मनसे कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलकांना पुराण पोळ्या वाटून त्यांचे तोंड गोड केले असता मराठा बांधवांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आणि गणेशोत्सवाचा सण असून सुद्धा पुरणपोळी खाण्याची खूप इच्छा होती ती आज मनसे कार्यकर्त्यांनी पूर्ण केल्याबद्दल आंदोलकांनी आभार व्यक्त केले.ML/ML/MS