भारताने तयार केली पहिली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप

 भारताने तयार केली पहिली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप

नवी दिल्ली, दि. २ : भारताची पहिला स्वदेशी विक्रम मायक्रोप्रोसेसर चीप केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमिकॉन इंडिया 2025(Semicon India )या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया २०२५ चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थिती होत्या.

‘विक्रम’मध्ये ३२-बिट मायक्रोप्रोसेसरआणि चार मंजूर प्रकल्पांचे चाचणी चिप्सचा समावेश होता. विक्रम चिपची रचना इस्रोच्या सेमिकंडक्टर लॅबमध्ये झाली आहे. ती प्रक्षेपण यानांमधील कठीण हवामानात वापरण्यास पात्र आहे. ही चिप भारतात विकसित झालेली पहिली पूर्ण स्वदेशी ३२-बिट मायक्रोप्रोसेसर चीप आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, की काही वर्षांपूर्वी आपण पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने सेमी कंडक्टर मिशन सुरू केले. साडेतीन वर्षांनंतर आपण भारतात तयार झालेली पहिली चिप पंतप्रधानांना सादर करत आहोत.

सध्याच्या जागतिक अनिश्चित आणि अस्थिर काळात भारत एका प्रकाश स्तंभासारखा उभा आहे. गुंतवणुकदारांनी स्थिर धोरणे असलेल्या भारतात यावे. देशात मागणी प्रचंड आहे. दर तिमाहीत सेमिकंडक्टरची मागणी वाढत आहे. हीच भारतात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे, असे आवाहनही वैष्णव यांनी गुंतवणूकदारांना केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *