आठवणीतील कवी सोपानदेव म्हशाखेत्री यांना राज्यस्तरीय कवी संमेलनातून अभिवादन..

 आठवणीतील कवी सोपानदेव म्हशाखेत्री यांना राज्यस्तरीय कवी संमेलनातून अभिवादन..

गडचिरोली, दि २:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) व गडचिरोली जिल्हा कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने “आठवणीतील सोपानदेव म्हशाखेत्री राज्यस्तरीय कवी संमेलन २०२५” चे आयोजन गडचिरोली काँम्पलेक्स येथील बी.ओ. आय -स्टार आरसेटीच्या सभागृहात उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “धानोरा येथील सोपानदेव म्हशाखेत्री हे अत्यंत अभ्यासू विचारवंत, मनमिळावू स्वभावाचे आणि बहुआयामी कवी होते. त्यांच्या जाण्याने समाजात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. त्यांच्या स्मृतींना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.”

यावेळी मंचावर किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजप जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, चामोर्शी नगरपंचायतीचे नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, प्रा. मनोज जाधव, ॲड. पि.डी. डॉ. काटकर,भावना खोब्रागडे, प्रभाकरजी दुर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या माध्यमातून कवी सोपानदेव म्हशाखेत्री यांच्या समृद्ध साहित्यिक कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या कवितांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *