ठाण्यात ९९ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क
ठाणे दि १५ …ठाण्याच्या टेंभी नाका येथील परमार हाऊस मध्ये राहणाऱ्या शिव समर्थ विद्यालयाच्या माजी शिक्षिका लीला क्षोत्री वय वर्ष 99 यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सिने अभिनेता पुष्कर क्षोत्री यांच्या त्या पणजी आहेत.
शाळेचा माजी विद्यार्थी दिलीप फाटक याने त्यांना आपल्या रिक्षातून जवळच असलेल्या बि.जे हायस्कूल येथील मतदान केंद्रावर नेलं. सदर मतदान केंद्रावर बाईंना मतदान करायला उंच पडत असल्यामुळे केंद्रातील मदतनीस यांनी एकावर एक अशा तीन खुर्च्या लावून बाईंना त्यावर बसवले आणि मग त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
वय वर्ष 99 असूनही त्यांच्यातला उत्साह पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेली अनेक वर्ष त्यांनी नियमित मतदान केलेले आहे. आज या वयातही मुलांचे क्लासेस घेत असून शाळेतील माजी शेकडो विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या दिवशी न चुकता सकाळी पहिला फोन करतात इतकी त्यांची मेमरी शार्प असल्याने विद्यार्थी अवाक झाले आहेत.
सर्वांनी मतदान करून आपलं लोकशाहीचा हक्क बजवावा असे मतदान झाल्यावर त्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने त्यांचा ठाणे गौरव पुरस्काराने सन्मान केलेला आहे. 3 एप्रिल 2027 रोजी त्या शंभर वर्षात पदार्पण करणार असल्याने विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.ML/ML/MS