घन कचरा व्यवस्थापनात पर्यवेक्षकांची ९६ पदे रिक्त

 घन कचरा व्यवस्थापनात पर्यवेक्षकांची ९६ पदे रिक्त

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात सुमारे ३५ हजार कामगार, कर्मचारी कार्यरत आहेत. हा विभाग अत्यावश्यक सेवेत येतो. कामाचे व कामगारांचे दैनंदिन नियोजनाचे कार्य पर्यवेक्षकीय अधिका-यांकडून केले जाते. मात्र पर्यवेक्षकीय संवर्गाच्या एकूण ४२३ पदांपैकी ९६ पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने २४ वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करताना कार्यरत असलेल्य़ा पर्यवेक्षकांची दमछाक होते आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरून हा विभाग सुसज्ज करावा अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.

मुंबई महापालिकेत घनकचरा विभाग हा अत्यावश्यक सेवेत येतो. या विभागात सुमारे ३५ हजार कामगार, कर्मचारी कार्य़रत आहेत. मुंबईतील शहर व उपनगरांतील २४ वॉर्डातील कचरा संकलन करून तो डंपिंग गाऊंडवर टाकण्याचे काम या कामगारांकडून केले जाते. या विभागात सर्व वॉर्डातील घनकचरा व्य़वस्थापनाचे नियोजन करण्याचे काम पर्यवेक्षकीय अधिका-यांकडून केले जाते. पर्यवेक्षीय संवर्गात एकूण ४२३ पदांपैकी मुख्य पर्यवेक्षकांसह ९६ पदे रिक्त आहेत. यात उपमुख्य पर्यवेक्षक ६ तर कनिष्ठ पर्यवेक्षकांची ६५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे पालिकेच्या २४ वॉर्डातील घन कचरा व्यवस्थापनाचे काम करताना कार्ररत पर्यवेक्षकीय कर्मचा-यांवर अतिरिक्त जबाबदारीमुळे दमछाक होते आहे. हा विभागाकडून मुंबईतील नियमित कचरा संकलन करुन मुंबई स्वच्छ ठेवली जाते. अत्यंत महत्वाचा व अत्यावश्यक सेवेत येणारा या विभागात व्यवस्थापनाचे काम करणा-या पर्यवेक्षकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत असणा-या कर्मचा-यांवर कामाचा ताण येतो. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी म्युनिसिपल कामगार- कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

अशी आहेत रिक्त पदे —
पद — एकूण पदे — कार्यरत — रिक्त पदे
मुख्य पर्यवेक्षक – १ — ० — १
उपमुख्य पर्यवेक्षक — ८ — २ — ६
सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक — ३१ –१९ — १२
पर्यवेक्षक — ६५ — ५३ — १२
कनिष्ठ पर्यवेक्षक – ४२३ — ३५८ — ६५

SW/ML/SL

26 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *