महा विकास आघाडीचा आता प्रत्येकी ९० जागांचा फॉर्म्युला
मुंबई, दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन दिवसांपूर्वी प्रत्येकी ८५ जागांवर आणि एकूण २७० जागांवर सहमती झाल्याची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीचे अंकगणित चुकल्याची चौफेर टीका होताच आज प्रत्येकी ९० जागांवर सहमती झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येतेय त्यानुसार जागावाटपाचे मार्गी लावण्यासाठी नेतेमंडळींची घाई उडाली आहे असे दिसून येत आहे. ठरलं ठरलं म्हणता म्हणता आता महाविकास आघाडीने जागावाटपाचे नवे सूत्र पुढे आणले आहे परवा प्रत्येकी ८५ जागा सांगणारे संजय राऊत होते तर आज आघाडीतल्या ३ प्रमुख पक्षांना प्रत्येकी ९० जागा असे हे नवे सूत्र आहे आणि ते जाहीर केले आहे बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना १८ जागा दिल्या जातील असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले मात्र मित्र पक्षांना त्यापेक्षा अधिक जागा हव्या आहेत.
आज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला बारा जागा हव्या आहेत असे ते म्हणाले, तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तर स्वतंत्र लढवू असे ते म्हणाले.
ML/ ML/ SL
25 Oct ,2024