बिहारमध्ये कावड यात्रेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

बिहारमधील वैशालीमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी डीजेवर गाणं वाजवत कावड यात्रा जात होती. यावेळी भाविकांच्या वाहनाला हाय टेंशन वायरचा धक्का लागला, या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. यावरुन आता विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून एसडीएम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचताच ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला होता. या घटनेत दोन यात्रेकरुंची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वैशालीच्या हाजीपूर इंडस्ट्रियल पोलीस स्टेशन परिसरात घडली. सोनपूर बाबा हरिहरनाथ येथे गंगाजलानं जलाभिषेक करण्यासाठी हे सर्वजण जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.