निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

 निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. यात शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० पेक्षा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील सरासरी ८९ हजार निराधार योजनेतील महिलाही या योजनेला आता मुकणार आहेत. संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत या निराधार महिलांचा समावेश असतो.

निराधार योजनेतील महिला लाभार्थी संख्या
संजय गांधी योजना – ३८,३२५
इंदिरा गांधी योजना – २५,७९६
श्रावणबाळ योजना – ४१,१८८

89 thousand women in Niradhar Yojana will miss Ladaki Bahin Yojana

ML/ML/PGB
4 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *