तब्बल 8 कोटींचा रेडा शेतकरी मेळ्यात दाखल

मेरठ,दि. 10 : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नुकत्याच झालेल्या किसान मेळ्यामध्ये एका ‘विधायक’ नावाच्या रेड्याने (Reda) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मुर्रा जातीच्या रेड्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये इतकी लावण्यात आली आहे. रेड्याची ही अवाढव्य किंमत ऐकून त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोकांनी मेळ्यामध्ये मोठी गर्दी केली होती. हा ‘विधायक’ नावाचा मुर्रा प्रजातीचा रेडा त्याच्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे आणि आकर्षक लुकमुळे प्रदर्शनाचा हिरो ठरला आहे. त्याचे फोटो घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेते हरियाणाचे शेतकरी नरेंद्र सिंह हे या रेड्याचे मालक आहेत. त्यांनी त्याला प्रेमाने विधायक हे नाव दिलं आहे. मेरठमध्ये लागलेल्या किसान मेळ्यात हा रेडा पोहोचला आणि मालकाने त्याची किंमत 8 कोटी रुपये सांगितली, तेव्हा उपस्थितांना धक्का बसला. मुर्रा जातीचा रेडा इतक्या किमतीचा असू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार विधायक’ आहारात बदाम , काजू आणि देशी तूप खातो. याशिवाय तो मोहरीचे तेल आणि दररोज 8 ते 10 लीटर दूध देखील पितो. नरेंद्र सिंह सांगतात की, इतकी मोठी किंमत लागूनही त्यांना ‘विधायक’ला विकायचे नाही. ते या रेड्याच्या वीर्याची विक्री (Semen Sale) करून दरवर्षी लाखों रुपये कमावतात.
SL/ML/SL 10 Oct. 2025