राज्य सरकारकडून मराठी चित्रपटांना ८ कोटींचे अनुदान

 राज्य सरकारकडून मराठी चित्रपटांना ८ कोटींचे अनुदान

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारकडून २५ मराठी चित्रपटांना तब्बल ८ कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरित होणार आहे. या चित्रपटांची यादी सरकारने जाहीर केली आहे. यामध्ये काही चित्रपटांना ३९ लाख रुपये तर काही चित्रपटांना २९ लाख रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. अ आणि ब अशा दोन वर्गवारीमध्ये हे अनुदान देण्यात आले आहे.

‘अ’ दर्जाचे अनुदान प्राप्त चित्रपट

दशक्रिया, बार्डो, बापजन्म, झिपऱ्या, रिडिमिक्स, बॉईज, सुरसपाटा, एक सांगायचंय अनसेड हार्मोनी, मिस यु मिस्टर, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लिझ, येरे येरे पैसा, मन उधान वारा

‘ब’ दर्जाचे अनुदान प्राप्त चित्रपट

सन १९८१, एचटूओ कहाणी थेंबाची, जजमेंट, शिमगा, सिटीझन, लव्ह यू जिंदगी, लकी, रंगिला रायबा, हॅप्पी बर्थडे, पल्याडवासी, पोशिंदा, हाक

या २५ चित्रपटांना ८ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात येत आहे. अ दर्जाच्या चित्रपटांना ३९ लाख रुपये तर ब दर्जाच्या चित्रपटांना २९ लाख रुपये वितरित करण्यात येत आहेत.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी स्पर्धा करत चित्रपटगृह मिळवण्यासाठी झगडणाऱ्या मराठी चित्रपट निर्मात्यांना राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या या अनुदान रकमेमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.

SL/KA/SL

20 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *