७६ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा,कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन

 ७६ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा,कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन

नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली.

आज इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कर्तव्य पथावरील संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी झाला.

कर्तव्यपथावर आज १६ राज्य, केंद्रशासित प्रदेश, तसेच केंद्र सरकारच्या १० मंत्रालयांनी आपले चित्ररथ सादर केले.इंडोनेशियन राष्ट्रीय लष्करी दलाच्या वतीने कर्तव्यपथावर संचलन केले. यावेळी इंडोनेशियाच्या विविध लष्कर दलातील १९० अधिकारी, सैनिक उपस्थित होते.कर्तव्यपथावर संचलन सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध भागातून आलेल्या ३०० कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने “सारे जहाँ से अच्छा…” हे गीत सादर केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, आपले संविधान निर्माण करून ज्यांनी हे सुनिश्चित केले की, आपली विकास यात्रा लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकतेच्या मार्गावर असेल, त्या सर्वांना मी आज अभिवादन व्यक्त करतो. मला आशा आह की, हा राष्ट्रीय उत्सव संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करत एक सशक्त आणि समृद्ध भारत बनविण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना आणखी बळकट करेल.

SL/ ML/ SL

26 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *