75 गडकिल्यावरिल माती घेऊन ‘ हिंदवी स्वराज्य यात्रा ’ दिल्लीला

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या 75 वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रथमच महाराष्ट्रतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील 75 गडकिल्यावरिल माती कलशामध्ये घेऊन युवकांमध्ये शिवरायांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी दिल्लीला हिंदवी स्वराज्य यात्रेच्या ठिकाणी घेऊन त्याची पूजा करण्यात येणार आहे. अशी माहिती अभाविप चे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
अभाविपच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाच्या निमित्ताने 7 ते 10 डिसेंबर रोजी इंद्रप्रस्थ नगर, डी. डी. ए. मैदान दिल्ली येथे अभाविपचे 69 वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होणार आहे.
अभाविप महाराष्ट्रातील शिवस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांवरील मातीचा कलश हिंदवी स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून अभाविपचे 20 कार्यकर्ते बाईक रॅलीच्या माध्यमातून 7 डिसेंबर पर्यंत दिल्ली पर्यंत घेऊन जाणार आहे.
या रॅलीच्या मार्गामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली या 4 राज्यातील 34 प्रमुख शहरामध्ये शिवचरित्रावर व्याख्याने आयोजित केली गेली आहेत. देशाचा अमृत काळामध्ये स्वतःचे आरमार, स्वतःचे चलन, स्वतःचे गडकिल्ले, स्वतःचे राज्यशासन, स्वतःचे कारखाने उभारण्याचे शिवरायांचे कर्तुत्व आजच्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेची प्रेरणा देते. हाच संदेश घेऊन छत्रपतींच्या राजधानीहुन हि यात्रा आपल्या देशाच्या राजधानीकडे 28 नोव्हेंबर रोजी प्रस्थान करेल आणि 7 डिसेंबर, 2023 रोजी अभाविपचा राष्ट्रीय अधिवेशनस्थळी पोहोचेल.
अभाविपच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये हिंदवी स्वराज्य यात्रेचे भव्य स्वागत होईल. दिल्लीत संपन्न होणाऱ्या या अधिवेशनामध्ये भारताच्या सर्व कानाकोपर्यातून तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून शिकणारे 8 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याच राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अभाविप आपल्या कार्याची पुढची दिशा ठरवण्यासाठी विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर प्रस्ताव पारित करेल.
हे प्रस्ताव भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरतील. अधिवेशनमध्ये प्रतिवर्षी प्रमाणे प्राध्यापक यशवंत राव केळकर युवा पुरस्कार प्रदान सोहळा , विविध गटशः चर्चा, भाषण सत्रे देखील पार पडतील. असे ईशांत गणपुले यांनी दिली.
ML/KA/PGB
27 Nov 2023