७१० किलो नकली खवा जप्त

वाशीम, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):
वाशीम शहरातील मिठाईच्या दुकानात एका कार द्वारे विक्रीस आणलेला २ लाख ३० हजारांचा ७१० किलो नकली खवा आणि मिठाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून ऐन दिवाळीच्या तोंडावर नकली खवा आणि मिठाई पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नकली खवा आणि मिठाईची वाशीम मध्ये विक्री होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी शहरातील पुसद नाक्यावर एका कारमध्ये आणलेला खवा आणि मिठाईची तपासणी केली असता कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने त्यांनी हा खवा, मिठाई आणि कार जप्त केली असून दोन आरोपिंना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आले आहे. या प्रकरणाचा तपास अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग करीत आहेत.
ML/KA/PGB 6 Nov 2023