हनुमान कढईमध्ये तयार झाला ७ हजार किलोचा ‘श्रीराम हलवा ’

 हनुमान कढईमध्ये तयार झाला ७ हजार किलोचा ‘श्रीराम हलवा ’

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्‍येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना कोराडी येथील श्रीजगदंबा देवस्‍थानमध्‍ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर भव्यदिव्य अशा जय हनुमान कढईमध्ये ६ हजार किलोचा ‘श्रीराम श‍िरा’ तयार करीत आहेत. हा एक विश्‍वविक्रम ठरणार असून तो विष्‍णू मनोहर श्री जगदंबा संस्‍थान कोराडीच्‍या नावे समर्पित करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हा प्रसाद बनविण्यासाठी आपले योगदान दिले. त्यांनी यावेळेला विविध प्रकारच्या वस्तू कढई मध्ये घातल्या तसेच सराटा देखील चालविला. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी परिसर येथे हा प्रसाद तयार होत असून हा प्रसाद तयार झाल्यानंतर तो नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे. ६ हजार किलो हा राम शिरा तयार होत असताना त्यात आणखी साहित्य पडल्यावर तो 7 हजार किलोचा राम हलवा तयार झाला.

ML/KA/SL

22 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *