खवले मांजर तस्करी प्रकरणी ७ जणांना अटक

 खवले मांजर तस्करी प्रकरणी ७ जणांना अटक

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे परिसरातील जंगल क्षेत्रामध्ये दुर्मिळ वन्यजिवांच्या प्रजाती आढळून येतात.तस्करांकडून या दुर्मिळ वन्यजिवांच्या जीवावर उठलेल्याच्या काही घटना समोर येत असून वन विभागाकडून या तस्करांवर कठोर कारवाई करण्या येत आहे. वनांच्या अन्नसाखळीतील महत्त्वूर्ण योगदान असणाऱ्या खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळात मोठी कारवाई करण्यात आली आहे. घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजर या शेड्युल 1 मधील वन्यप्राण्याची तस्करी केल्या प्रकरणात 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 6 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली. वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर 1926 या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार आणि तस्करी होत असल्यास वनविभागास कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवल्या मांजराची होते. खवले मांजर हा प्राणी वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये येत असून सदर प्राण्याची शिकार करणं, तस्करी करणं किंवा जवळ बाळगणं यासाठी सात वर्षे सक्त कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

SL/KA/SL

18 Feb.2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *