आसारामला उच्च न्यायालयाकडून ७ दिवसांचा पॅरोल
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसारामला उच्च न्यायालयाकडून 7 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला पुण्यातील माधोबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पॅरोल देण्यात आला आहे. न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या न्यायालयात आसारामचा पॅरोल मंजूर करण्यात आला. आसाराम गेल्या चार दिवसांपासून जोधपूर एम्समध्ये दाखल आहे.
आसारामने उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता, मात्र तो प्रत्येक वेळी फेटाळण्यात आला. यापूर्वी आसारामला जोधपूर येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तेथे आसारामने पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले.
25 एप्रिल 2018 रोजी जोधपूरच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आसाराम 2 सप्टेंबर 2013 पासून तुरुंगात आहे. दोन वर्षांपूर्वी, गुजरातच्या एका न्यायालयाने आसारामला 2013 मध्ये त्याच्या सुरतच्या आश्रमात एका महिला अनुयायीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
SL/ML/SL
13 August 2024