7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मध्यपूर्वेतील या देशांमध्ये शेकडो मृत्यू

 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने मध्यपूर्वेतील या देशांमध्ये शेकडो मृत्यू

अंकारा,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज सकाळी मध्यपूर्वेतील  तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल हे चार भूकंपाच्या प्रचंड धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. 7.8 रिश्टर स्केल एवढ्या प्रचंड तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कियेमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे.  दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या आहेत.

शेकडो मृत्यूमुखी

या प्रचंड विनाशकारी अशा  भूकंपाने तुर्कीमध्ये आतापर्यंत 284 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 440 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर सीरियामध्ये 237 लोक मारले गेले तर 639 जखमी झाले. तुर्कीयेमध्ये मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली आहे. ही संख्या 10 हजारांपर्यंत पोहोचू शकते. असा अंदाज युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे ने व्यक्त केला आहे.  लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु येथे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

तुर्कीची राजधानी अंकारासह गझियानटेप, कहरामनमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी या मोठ्या शहरात प्रचंड हानी झाली. येथे 250 हून अधिक इमारती कोसळल्याचं वृत्त आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अनेक भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

या देशांनाही बसला धक्का

तूर्कस्तानशिवाय सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशांमधील भूकंपाचे फोटो व्हायरल होत आहेत. तूर्कस्तानात मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे. अनेक देशांमध्ये स्थानिक प्रशासनांनी भूकंपानंतर बचाव मोहिमा हाती घेतल्या आहेत.

दरम्यान या भीषण  दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून तुर्कीला आवश्यक ती सर्व प्रकारच्या मदतीची घोषणा केली.

SL/KA/SL

6 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *