बीड जिल्ह्यातील 06 प्रकल्प ओव्हर फ्लो…!
बीड दि ३१– बीड जवळचा बिंदुसरा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीसच ओसंडून वाहू लागला. याचे जलपूजन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.. या तलावातून बीड शहराच्या काही भागाला तसेच परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो तसेच मोठ्या प्रमाणात शेती सिंचनासाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो यावर्षी मे महिन्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे हा प्रकल्प ओसंडून वाहू लागला असून जलपूजना वेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात एकूण 143 प्रकल्प आहेत त्यापैकी सर्वात मोठा प्रकल्प म्हणून माजलगाव प्रकल्प ओळखला जातो त्यानंतर मध्यम प्रकल्प बिंदुसरा, मुंगी डोकेवाडा, करचुंडी, धामणगाव ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात बीड जिल्ह्यातील मध्यम सहा प्रकल्प भरल्याने परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र भविष्यात शेतीसाठी लागणारा पाऊस पडेल का अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे.