६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत मानाचे समजले जाणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाले. यामध्ये ‘एकदा काय झालं’, या सलील कुलकर्णी दिग्दर्शित आणि सुमित राघवन अभिनित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले.

रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘गोदावरी’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून तर चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘चंद सासें’ या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक सिनेमा हा पुरस्कार घोषित झाला आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमासाठी अलिया भट आणि ‘मिमी’ या सिनेमासाठी क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार विजेते आणि चित्रपट

सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जून (पुष्पा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा – सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा – एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी – आरआरआर

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा

सर्वोत्कृष्ट एडिटर – गंगूबाई काठियावाडी

ML/KA/SL

24 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *