६८ लिंगाच्या तैलाभिषेकाने सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

सोलापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आज सुरुवात झाली. मानकरी असणाऱ्या हिरेहब्बू यांच्या वाड्यातून नंदीध्वजाची पूजा करत मानाचे पहिले दोन नंदीध्वज हे 68 लिंगांच्या तैलाअभिषेक प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगापासून तैलाभिषेकाला सुरुवात झाली. यावेळी सात मानाचे नंदिध्वजना मानकरी असणारे देशमुख यांच्याकडून सरकारी आहेर देण्यात आला.
आज सकाळी सुरू झालेल्या या यात्रेत प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू , सागर हिरेहब्बू , आ. विजयकुमार देशमुख यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सहभागी झाले होते. यावेळी सिद्धेश्वर महाराजांच्या भक्तामध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. 68 Siddeshwar Yatra begins with oil consecration of the linga
ML/KA/PGB
13 Jan 2024