६७ वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अकोल्यात

अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील 28 राज्यातील 1,200 शालेय खेळाडू सहभागी असणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेला आजपासून अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियममध्ये सुरु झाली.

24 ते 29 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन मशाल पेटवून भारतीय बॉक्सींग संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार्थी जी.एस. संधू यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अकोल्याला पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा सन्मान मिळाला असून स्पर्धेत 14,17 आणि 19 वर्षगटातील मुलांचे 36 संघ सहभागी झाले आहेत. विविध राज्यातील शालेय स्पर्धकांनी पथसंंचलन केले तसेच पारंपारिक वेशभूषाही साकारल्या होत्या.
उद्यापासून राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विविध राज्यातील संघांमध्ये स्पर्धा होणार आहेत.

ML/KA/SL

24 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *