रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

 रायगडातील ६७ हजार महिलांची धुरापासून मुक्ती

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० चा तिसरा टप्पा सध्या अलिबागमध्ये सुरू आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. या टप्प्याचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यात 2,097 नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील एकूण 67,152 व्यक्तींनी याचा लाभ घेतला आहे, परिणामी महिलांना धुराचे प्रमाण कमी झाले आहे.

67 thousand women in Raigad freed from smoke

ग्रामीण व निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील खऱ्या पारंपारिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत असतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात. जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील खियांना स्वयंपाक करावा लागतो. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेवून प्रधानमंत्री ‘उज्ज्वला योजना’ कार्यान्वित करण्यात आली.

ML/KA/PGB
12 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *