६६ कोटी भाविकांनी ४५ दिवसांत केले त्रिवेणी संगमात पवित्र स्नान, महाकुंभाची सांगता
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ४५ दिवसांपासून पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. काल महाशिवरात्रीच्या स्नानानंतर या महाकुंभाची सांगता झाली आहे. इतर दिवसांप्रमाणे कालही कोट्यवधी भाविकांनी महाकुंभात येऊन त्रिवेणी संगमात स्नान केले. या भाविकांना भारतीय हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानांनी ‘महा सॅल्यूट’ दिला. सरकारी आकडेवारीनुसार, या 45 दिवसांत सुमारे 66 कोटी भाविकांनी त्रिवणणी संगमात पवित्र स्नान केले.