पौलस वाघमारे यांचा शुक्रवारी षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

पुणे, दि ११: पौलस वाघमारे फ्रेंड सर्कलतर्फे मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा, पुस्तक प्रकाशन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. ज्येष्ठ कवी, गझलकर म. भा. चव्हाण, मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे सरचिटणीस सायमन मार्टिन, मागासवर्ग आयोगाचे माजी समन्वयक मदन कोठुळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उरळीकांचन शाखचे अध्यक्ष सूर्यकांत घुगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. KK/ML/MS