फार्मसीच्या ६०० अधिक जागांना मिळाली मान्यता

छायाचित्र प्रातिनिधिक
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होऊन आता महाविद्यालयांमध्ये कधी प्रवेश मिळतो, याकडे लक्ष लागून राहीलेल्या विद्यार्थांसाठी आता राज्यात फार्मसीच्या ६०० अधिकच्या जागा उपलब्ध होणार आहेत. नवी दिल्लीच्या फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या मान्यतेच्या आधारे राज्यातील ६ संस्थांना औषध निर्माणशास्त्राच्या ६०० जागा २०२३-२४ पासून कायम विनाअनुदान तत्वावर सुरु करण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी (ता. १९) मान्यता दिली.
त्यात बी. फार्मसीच्या ३६० आणि डी. फार्मसीच्या २४० जागांचा समावेश आहे. अंजनेरीच्या (ता. त्र्यंबकेश्वर) ब्रह्मा व्हॅली इन्सिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसीच्या ६० जागा समाविष्ट आहेत. याशिवाय बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदुभाई भदाणे प्रतिष्ठानच्या फार्मसी महाविद्यालयात बी. फार्मसी आणि डी. फार्मसीच्या प्रत्येकी ६० जागा कायम विनाअनुदानित तत्वावरील आहेत.
कायम विनाअनुदान तत्वावर बी. फार्मसी आणि डी. फार्मसीच्या प्रत्येकी ६० जागांना मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांची नावे अशी : नागपूरचे गायकवाड पाटील, नगरची विश्वभारती अकादमी, पुण्याचे सूर्यदत्ता, परभणीत श्रीराम प्रतिष्ठानच्या आदित्य संस्थेच्या बी. फार्मसीच्या ६० जागांनाही मान्यता मिळाली.
अन्य विज्ञानाच्या अन्य ज्ञानशाखांमधील मर्यादित जागामुळे स्पर्धेच्या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना फार्मसीच्या जागा वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी या जागा विना अनुदानित असल्यामुळे प्रवेशासाठी मोठे शुल्क मोजावे लागणार एवढे मात्र नक्की.
SL/KA/SL
20 June 2023