बाप्पाच्या माहेघरातून ६० हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना…

 बाप्पाच्या माहेघरातून ६० हजार गणेशमूर्ती परदेशी रवाना…

अलिबाग, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण जगभरात अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने गणेशमूर्तीच्या माहेरघरात अर्थात पेण मध्ये कारखानदार आणि कारागीर याची लगबग जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसात इथून सुमारे साठ हजार गणेशमूर्ती परदेशासह देशभरात रवाना झाल्या आहेत.

अवघ्या दोन दिवसावर गणपतीचे आगमन होत असल्याने अनेक जगभरासह अनेक राज्यातून गणपती खरेदी करण्यासाठी गणेशमूर्तीच्या या माहेरघरात येत असतात. तालुक्यातील अंतोरे, दादर, जोहे, कळवे, तांबडशेत, हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की, उंबर्डे, कोप्रोली यासह शहरातील कासार आळी, गुरवआळी, फणसडोंगरी, नवीन वसाहत, कुंभारआळी, गांगल आळी, नंदिमाल नाका, उत्कर्ष नगर येथे देखील पुर्वीपासून असणारे गणपती कारखाने दिवस-रात्र सुरू असून या कारखान्यांमधील कारागीर मुर्तींवर रंगकाम, दागिन्यांची सजावट, डोळे आखणी यावर अखरेचा हात फिरवण्यासाठी मग्न झाले आहेत.

या ही वर्षी बाप्पाच्या माहेघरातून थायलंड, अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया मॉरिशससह इतर राज्यात जवळपास ६० हजार गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात पेणच्या गणेश मूर्तीची ओळख निर्माण झाली आहे.
त्यामुळे देश विदेशातून पेणच्या गणेशमूर्ती मागणी असते.

पेणच्या गणेश मुर्तीची रंगरंगोटी सुंदर असून डोळ्यांची आखणी देखणी असल्याने तसेच दागिन्यांची सजावटही आकर्षक असल्याने पेणच्या गणेशमूर्तीं थायलंडसह इतर देशातील गणेश भक्तांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे थायलंडच्या गणेश भक्तांनी पेणच्या दिपक कला केंद्राला भेट देत आहेत.
पेण च्या मूर्ती जगभरात प्रसिद्ध असल्याने आम्ही सुध्दा पेणच्या गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी पेण च्या दीपक कला केंद्रात भेट दिली. परंतू कोरोना काळानंतर या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहून आम्ही सुध्दा भारावून गेलो अशी त्यांची भावना आहे.

ML/ML/SL

5 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *