वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबईत बाधले जाणार ६ बोगदे

 वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबईत बाधले जाणार ६ बोगदे

मुंबई, दि. 27 : वाहतूककोंडी (Traffic)सोडविण्यासाठी मुंबईत नवीन ६ बोगदे बांधणार- मुंबई महापालिका (BMC)आता शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर आणि उपनगरांना जोडणारे नवे सहा बोगदे बांधणार आहे. या कामासाठी पालिकेने ४,३९२ कोटींच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक बोगद्यासाठी ७३२ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
यामध्ये कंत्राटदाराची निवड झाल्यावर प्रकल्पाचा आराखडा निश्चित केला जाईल.

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,मुंबई शहरात होणार्‍या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून पालिकेने मुंबईच्या पूर्व (Eastern) व पश्चिम उपनगरात सहा बोगदे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे बोगदे गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (Goregaon–Mulund Link Road)आणि मुंबई कोस्टल रोड (Mumbai Coastal)(पहिला व दुसरा टप्पा) यांच्याशी जोडले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी पालिका प्रशासन एकूण ४,३९२ कोटी रुपये खर्च करणार आहे, तर प्रत्येक बोगद्याच्या बांधकामासाठी ७३२ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह(Orange Gate to Marine Drive)दुहेरी बोगदा प्रकल्प असून तो मरिन ड्राईव्हला समांतर बांधला जात आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील फ्रीवेला अटल सेतूशी जोडले जाईल आणि दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल . हा बोगदा एकाच वेळी दोन दिशांना जाईल,त्यामुळे याला दुहेरी बोगदा म्हटले जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *