यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100 टक्के भरले

 यवतमाळ जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100 टक्के भरले

यवतमाळ, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहराला पाणीपुरवठा करणारे दोन्ही प्रकल्प तुडुंब भरले असून गेल्या सहा दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात संतोषजनक पाऊस पडत आहे. परिणामी जिल्ह्यातील सहा प्रकल्प 100% भरले असून त्यामध्ये गोखी, वाघाडी, सायखेडा ,नवरगाव, चापडोह, आणि निळोणा या प्रकल्पाचा समावेश आहे.

यापैकी यवतमाळ शहराला चापडोह आणि निळोणा या धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान बेंबळा प्रकल्पाच्या साठवण क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने पाण्याची मोठी वाढ झाल्याने धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. गेल्या सहा सात दिवसापासून संपूर्ण ढगाळ वातावरण आहे परिणामी शेतातील पिकं पिवळी पडत आहेत.

ML/ML/SL

27 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *