अंधेरीत दरड कोसळून 6 घरांचे नुकसान

 अंधेरीत दरड कोसळून 6 घरांचे नुकसान

मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : रायगडच्या इरसालवाडीमध्ये दरड कोसळून 27 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर गुरुनानक शाळेजवळ असलेल्या सात मजली ‘रामबाग’ गृहनिर्माण सोसायटीच्या मागील डोंगरावरची माती मध्यरात्री दीडच्या सुमारास खाली सरकू लागली लागल्याने पाच सहा घराचे नुकसान झाले आहे. या घटनेने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतीमधील सुमारे 165 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. रहिवाशांची सध्या गुंदवली येथील महापालिका शाळेत तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईतील अंधेरी ( पूर्व) चकाला परिसरातील रामबाग सोसायटीमध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळ्याची दुर्घटना घडली आहे. रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेला डोंगराचा काही भाग कोसळून चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये मातीचे ढिगारे शिरले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली होती. झोपेत असतानाच अचानक मातीचे ढिगारे चाळीत शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दरड दुर्घटनामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पाच ते सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चकाला येथे असलेली रामबाग सोसायटीत तब्बल 23 वर्षे जुनी आहे.रामबाग सोसायटीच्या शेजारी असलेल्या डोंगरावरुन चाळीवर सतत माती कोसळत आहे. त्यामुळे चाळीमधील 165 घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाचा दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे पथर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चाळीमधील नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

SW/KA/SL

25 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *