५ वी आणि ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर
मुंबई,दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. या दोन्ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्हात एकाच दिवशी 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.
परीक्षा परिषदेच्या https://2023.mscepuppss.in/startpage.aspx या संकेतस्थळावर याबाबतची अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 डिसेंबर ही या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
तर विलंब शुल्कासह 23 डिसेंबर तर अती विलंब शुल्कासह 31 डिसेंबर पर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
SL/KA/SL
17 Nov. 2022